Singham Again Review: रामायणाची कथा आणि रोहित शेट्टीची अॅक्शनचा धमाका

Singham Again Review: रामायणाची कथा आणि रोहित शेट्टीची अॅक्शनचा धमाका

नुकताच प्रदर्शित झालेला सिंघम अगेन यामध्ये अनेक नावाजलेले चेहरे पाहायला मिळाले आहेत. सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवरची कमाई 173 कोटींवर पोहोचली आहे.
Published on
Review(2.5 / 5)

महाभारत आणि रामायण यांच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट आणि मलिका आजवर निर्मित झाले आणि ते पाहायला मिळाले. रामायणावरच अवलंबून रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट 1 नोव्हेंबंरला प्रदर्शित झाला. या आधी रोहित शेट्टीने पोलिस यंत्रणेवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित केले. त्यामध्ये 2011मध्ये सिंघम हा सुपर डुपर हिट झाला. त्यानंतर त्याने 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स मधून अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले ज्यात करिना कपूर ही लिड हिरोईन म्हणून काम करत होती. त्यानंतर सिंम्बा आणि सुर्यवंशी यांसारख्या चित्रपटातून रोहित शेट्टीने अक्षय कुमार, रणवीर सिंग या भन्नाट एनर्जी असणारे कलाकार प्रेक्षकांसमोर उभे केले. यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेला सिंघम अगेन यामध्ये अनेक नावाजलेले चेहरे पाहायला मिळाले आहेत. सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवरची कमाई 173 कोटींवर पोहोचली आहे.

चित्रपटातले कलाकार आणि पात्र: सिंघम अगेन हा चित्रपट रोहित शेट्टी दिगदर्शीत असून यात मुख्य भूमिका बाजीराव सिंघम ही अजय देवगण साकारताना दिसणार आहे. तर अवनी ही भूमिका करीना कपूर साकाराताना दिसत आहे जी बाजीराव सिंघम याची पत्नी दाखवली गेली आहे. तसेच यात सिंबा हे पात्र रणवीर सिंह साकारत असून एक नवीन पात्र पाहायला मिळत आहे ते म्हणजे लेडी सिंघम शक्ती शेट्टी, हे पात्र दीपिका पदुकोण साकारत आहे. तसेच सत्या हे पात्र देखील नवीन असून ते टायगर श्रॉफ साकारत आहे. सुर्यवंशीमध्ये अतिरेकी ओमार हफीज म्हणून जॅकी श्रॉफ यांची एक झलक दाखवण्यात आली होती ते यात खलनायक असून रावण म्हणजे डेंजर लंका ऊर्फ जुबैर हफीज अर्जुन कपूर त्याचा नातू दाखवण्यात आला आहे. तसेच सूर्यवंशी म्हणून अक्षय कुमार असे पात्र पाहायला मिळत आहे.

चित्रपटाची कथा: चित्रपटाची कथा ही पुर्णपणे रामायणावर अवलंबून आहे ज्यात सिंघमचा बदला घेण्यासाठी अतिरेकी ओमार हफीज हा त्याच्या नातवाला म्हणजेच जुबैर हफीजला अवनीला श्रीलंकेत पळवून नेतो. यानंतर अवनीला वाचवण्यासाठी सिंघम मदुराईला पोहोचते तिथे त्याची भेट लेडी सिंघम शक्ती शेट्टीसोबत होते. यानंतर रामेश्वरममध्ये लक्ष्मणच्या रूपात सत्या आणि बजरंगबली हनुमान यांच्या रुपात सिंबा तर गरुडदेव यांच्या रुपात सूर्यवंशी यांच्यासोबत सिंघमची भेट होते. यानंतर तो यासर्वांच्या मदतीने रावण म्हणजेच अवनीला पळवून नेणारा जुबैर हफीज याच्यासोबत संघर्ष करतो आणि पुढे तो त्याच्यापासून अवनीची सुटका करतो. यामागे कथा जरी रामायणाची असली तरी यात अतिरेकी ओमार हफीज याचा मुख्य हेतू हा सिंघमसोबतचा बदला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटाचा रिव्ह्यू: सिंघम अगेन या चित्रपटात अॅक्शनला महत्त्व दिलं गेलं असून अॅक्शन सीन आकर्षक आहेत. मात्र एका खलनायकाला मारण्यासाठी याठिकाणी मोठमोठे तारे जमले आहेत. मात्र ही लढाई मनोरंजन तितक असं करु शकली नाही. यामध्ये अक्षय, दीपिका, टायगर पडद्यावर रिकाम्या जागा भरताना दिसत आहेत. तर रणवीर सिंघ यांच्या एनर्जेटीक अॅक्टने मनोरंजन सांभाळून घेतल आहे. सलमान खानच्या चुलबुल पांडेचा अवतार असलेला चर्चित कॅमिओही चित्रपटाच्या क्लायमॅक्सला पाहायला मिळत आहे. चित्रपटाला 2.5 एवढे रेटिंग पडले आहेत. मात्र जर भूल भुलैया 3 आणि सिंघम अगेन या दोघांमध्ये तुलना करायची झाली तर भूल भुलैया 3 ने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com